''अजित पवारांना यंदाची दिवाळी एकट्यालाच दिवाळी साजरी करावी लागणार"

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुढील काळात आम्ही भाजपबरोबर राहणार नाही, हे मी निश्चित सांगतो. बाकी दुसर्‍याचंच कोणाबरोबर राहायचं हे ठरत नाही, त्यामुळे आमचं ठरत नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तसेच अजित पवार यांना यावेळेची दिवाळी ही त्यांना एकट्यालाच साजरी करावी लागणार आहे. पण पुढच्या वर्षी ते दिवाळी कुटुंबांसोबत साजरी करतील, अशी … The post ''अजित पवारांना यंदाची दिवाळी एकट्यालाच दिवाळी साजरी करावी लागणार" appeared first on पुढारी.

''अजित पवारांना यंदाची दिवाळी एकट्यालाच दिवाळी साजरी करावी लागणार"
Vanchit Bahujan Aghadi prakash ambedkar commented on ajit pawar after ncp spilt in pune

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुढील काळात आम्ही भाजपबरोबर राहणार नाही, हे मी निश्चित सांगतो. बाकी दुसर्‍याचंच कोणाबरोबर राहायचं हे ठरत नाही, त्यामुळे आमचं ठरत नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तसेच अजित पवार यांना यावेळेची दिवाळी ही त्यांना एकट्यालाच साजरी करावी लागणार आहे. पण पुढच्या वर्षी ते दिवाळी कुटुंबांसोबत साजरी करतील, अशी आशा करू, असा टोला या वेळी त्यांनी लगावला आहे.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांंशी बोलत होते. आगामी लोकसभा निवडणूक जिंकायची आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांना फोडले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली होती. त्यावर अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, अजित पवार हे एक स्मॉल प्लेअर आहेत. कर्नाटकच्या निवडणुकांच्या आधी अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले होते. त्या वेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागा भाजपला जिंकायचा आहेत, असे सांगितले होते. त्यातच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्यांना नुकसान झाले. तिथे झालेले नुकसान त्यांना महाराष्ट्रातून भरून काढायचं आहे. विरोधी पक्षच जर आपण ठेवला नाही, तर आपल्याला सर्व जागा जिंकता येतील हे त्यांना माहीत आहे. दुर्दैवाने राज्यातील विरोधी पक्ष भाजपची ही स्कीम समजू शकला नाही, याच दुःख असल्याचेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

अजित पवार यांना यावेळेची दिवाळी ही त्यांना एकट्यालाच साजरी करावी लागणार आहे. पण पुढच्या वर्षी ते दिवाळी कुटुंबांसोबत साजरी करतील, अशी आशा करू, असा टोला या वेळी त्यांनी लगावला आहे.

सरकारला शेतकर्‍यांशी काही देणे-घेणे नाही

पुरेसा पाऊस झालेला नाही, पेरण्याही अर्धवट आहेत. परिणामी, शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले. अधिवेशनाच्या पूर्वसंधेला झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी हा शेवटचा मुद्दा होता. त्यामुळे राज्य सरकारला शेतकर्‍यांशी काही देणे-घेणे नाही, अशी टीकाही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

हेही वाचा:

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करणार :  प्रकाश आंबेडकर

Maharashtra Assembly Session | विधानभवनात दोन पवार गट, नेमके कोणाकडे किती आमदार?

आमदार यशवंत माने यांच्यावर तालिका अध्यक्षांची महत्वपूर्ण जबाबदारी

 

The post ''अजित पवारांना यंदाची दिवाळी एकट्यालाच दिवाळी साजरी करावी लागणार" appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow