कार दुचाकीचा भीषण अपघात तिघे गंभीर

 0
कार दुचाकीचा भीषण अपघात तिघे गंभीर

केज प्रतिनिधी:- केज अंबाजोगाई रोडवरील दोन ते तीन किमी अंतरावर असलेल्या माऊली जिनिंग च्या समोर कार आणि दुचाकीच्या अपघातात तिघे गंभीर झाल्याची घटना सोमवारी (दि.11) संध्याकाळी सात च्या दरम्यान घडली. 

केज बीड रोडवर माऊली जिनिंग च्या समोर केजहून जवळबन कडे जाणाऱ्या दुचाकीची (MH44AB8833) अंबेजोगाई कडून येणा कारची (MH25R6150) धडक झाली. यामध्ये जवळबन येथील महादेव जोगदंड, चैतन्य जोगदंड आणि अन्य एक तरुण (वैरागे) गंभीर जखमी झाले. सदरील अपघातात दुचाकीचा चुराडा झाला असून कारचेही समोरील भागाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सदरील घटनेची माहिती मिळताच तिघा जखमींना अंबाजोगाई च्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

SUNIL JADHAV Journalist Sunil Jadhav, an exceptional reporter and journalist, has made a remarkable impact through his platform, ilovebeed.com. With his relentless dedication and deep-rooted love for the city of Beed, Jadhav has become a voice that resonates with the people, capturing the essence of this vibrant region.