पचनशक्ती आणि आरोग्य

आपण जो आहार घेत असतो. त्या आहाराचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचे काम पचनशक्तीद्वारे केले जाते. पचनशक्ती मंदावली तर शरीरातील इन्शुलिन ग्रहण करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे कमी वयातच शरीर स्थूल होणे, थकवा येणे, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या व्याधी आपल्या पाठीमागे लागतात. अनेक जण संतुलित आहार घेत असतात. तसेच नियमित व्यायामही करत असतात, तरीही त्यांचे वजन कमी … The post पचनशक्ती आणि आरोग्य appeared first on पुढारी.

पचनशक्ती आणि आरोग्य
पचनशक्ती आणि आरोग्य

डॉ. संतोष काळे

आपण जो आहार घेत असतो. त्या आहाराचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचे काम पचनशक्तीद्वारे केले जाते. पचनशक्ती मंदावली तर शरीरातील इन्शुलिन ग्रहण करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे कमी वयातच शरीर स्थूल होणे, थकवा येणे, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या व्याधी आपल्या पाठीमागे लागतात. अनेक जण संतुलित आहार घेत असतात. तसेच नियमित व्यायामही करत असतात, तरीही त्यांचे वजन कमी होत नाही. अशा व्यक्तींची पचनशक्ती मंदावली आहे, असे समजले जाते.

पचनशक्ती मंदावण्याची अनेक कारणे आहेत. वयोमानानुसार पचनशक्ती मंदावत जाते. २५ वर्षांनंतर प्रत्येक दहा वर्षांत पचनशक्तीत पाच ते दहा टक्के घट होते. जे लोक अजिबात व्यायाम करत नाहीत त्यांची पचनशक्ती लवकर मंदावते व ती लवकर पूर्ववत होत नाही. यामुळे नियमित व्यायाम अत्यंत गरजेचा आहे. विशेषतः चाळीशी ओलांडल्यानंतर न चुकता व्यायाम करणे आवश्यक आहे. पचनक्रिया व्यवस्थित काम करण्यासाठी जॉगिंग, पोहोणे, टेनिस, बॅडमिंटन यासारखे खेळ खेळणे आवश्यक असते.

याचबरोबर शरीरातील थायरॉईड ग्रंथींचे कार्य व्यवस्थित चालू राहणे आवश्यक असते. या हार्मोन्सचे प्रमाण कमी जास्त झाले तर आपले वजनही कमी- जास्त होत असते म्हणून थायरॉईडची समस्या असणाऱ्यांनी डॉक्टरी सल्ल्यानुसार नियमित औषधोपचार घ्यावेत.
खूप वेळ उपाशी राहिल्यानंतर अन्नावर तुटून पडू नका. असे केल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर विपरीत परिणाम होत असतात. एकदम भरपूर जेवण्यापेक्षा दोन तीन तासांच्या अंतराने थोडे थोडे खाणे फायदेशीर ठरते. भरपेट जेवण्याने पचनक्रियेवर ताण पडू शकतो. तसेच एवढ्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी वेळ लागतो. ठराविक अंतराने थोडा थोडा आहार घेतल्यास ते अन्न पचणे सोपे जाते.

पचनक्रिया चांगली राहण्यासाठी व्यायाम व आहाराबरोबरच शरीराला पुरेशी विश्रांती देणेही अत्यंत आवश्यक असते. पुरेशी झोप न मिळाल्यास आपले वजन वाढण्याची शक्यता असते. आपल्या झोपेमध्ये शरीरातील ऊर्जेचा वापर होत असतो. रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे भूक लागल्यावर शरीराला अधिक उष्मां असणारे खाद्य पदार्थ खावेसे वाटतात. अधिक उष्मांक असणाऱ्या खाद्य पदार्थांमुळे आपल्या पचनक्रियेवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे कमीत कमी सहा ते सात तास रात्रीची झोप घेणे अत्यंत आवश्यक असते.

हल्ली क्रॅश डाएटचा ट्रेंड दिसून येतो. पण यामुळे आपल्या पचनशक्तीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. काही जणांची पचनशक्ती अनुवंशिकतेमुळेही व्यवस्थि नसते. अशा व्यक्तींनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्याव आणि औषधोपचार सुरू करावेत.

हेही वाचा :  

The post पचनशक्ती आणि आरोग्य appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow