पुणे: खडकवासला धरणक्षेत्रात पाऊस सक्रिय, प्रकल्पात सध्या ३१.०५ टक्के पाणीसाठा

खडकवासला (पुणे), पुढारी वृत्तसेवा: खडकवासला साखळीतील चारही धरणांच्या पाणलोटक्षेत्रात सोमवारी सकाळपासून पाऊस सक्रिय झाला. मात्र, जोरदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा असल्याने धरणसाठ्यात मंदगतीने वाढ सुरू आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणसाखळीत ९.०५ टीएमसी (३१.०५ टक्के) इतका पाणीसाठा झाला होता. गेल्या वर्षी १७ जुलै रोजी धरणसाखळीत १७.६७ टीएमसी (६०. ६२ टक्के) इतके पाणी होते. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा … The post पुणे: खडकवासला धरणक्षेत्रात पाऊस सक्रिय, प्रकल्पात सध्या ३१.०५ टक्के पाणीसाठा appeared first on पुढारी.

 0
पुणे: खडकवासला धरणक्षेत्रात पाऊस सक्रिय, प्रकल्पात सध्या ३१.०५ टक्के पाणीसाठा

खडकवासला (पुणे), पुढारी वृत्तसेवा: खडकवासला साखळीतील चारही धरणांच्या पाणलोटक्षेत्रात सोमवारी सकाळपासून पाऊस सक्रिय झाला. मात्र, जोरदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा असल्याने धरणसाठ्यात मंदगतीने वाढ सुरू आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणसाखळीत ९.०५ टीएमसी (३१.०५ टक्के) इतका पाणीसाठा झाला होता.

गेल्या वर्षी १७ जुलै रोजी धरणसाखळीत १७.६७ टीएमसी (६०. ६२ टक्के) इतके पाणी होते. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा निम्म्याने कमी आहे. अल्प पाणीसाठा असल्याने पुणेकरांसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा धरणसाखळीकडे लागल्या आहेत. रविवारी (दि. १६) सायंकाळपासून पानशेत, वरसगाव धरणखोऱ्यात रिमझिम पावसासह अधूनमधून सरी कोसळत आहेत. मात्र, खडकवासला धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे.

टेमघर धरण परिसरात २० मिमी पाऊस

सोमवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर धरण परिसरात २० मिलिमीटर, पानशेत व वरसगाव येथे प्रत्येकी १५ व खडकवासला येथे २ मिलिमीटर पाऊस पडला. टेमघर धरणात सध्या १८.४६ टक्के, वरसगावमध्ये ३१.९०, पानशेतमध्ये ३१.९८ आणि खडकवासला धरणात ४३.८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. तुरळक पावसामुळे धरणांच्या साठ्यात मंदगतीने वाढ होत आहे.

हेही वाचा:

Rahul Kalate: ठाकरेंना आणखी एक धक्का, राहुल कलाटे चार माजी नगरसेवकांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

पुनावळेतील जागेच्या बदल्यात चंद्रपूरची जागा महापालिका वन विभागास देणार

पिंपरी : पिंपळे गुरवच्या भाजी मंडईला मुहूर्त मिळेना

 

The post पुणे: खडकवासला धरणक्षेत्रात पाऊस सक्रिय, प्रकल्पात सध्या ३१.०५ टक्के पाणीसाठा appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow