मुलांची त्वचा असते खूप संवेदनशील, अशी घ्‍या काळजी...

लहान मुलांची त्वचा खूप नाजूक आणि संवेदनशीलही असते. त्यांच्या त्वचेची काळजी घेणे हे पालकांच्या दृष्टीने आव्हानच असते. पण थोडी सावधगिरी बाळगली, तर तुमच्या बाळाला त्वचेच्या विकारांपासून सहज दूर ठेवू शकाल. ( Child’s Sensitive Skin ) मुलांना प्रखर सूर्यप्रकाशात वावरू देऊ नका. है महत्त्वाचे आहे. कारण प्रखर उन्हात फिरल्यामुळे त्वचेचे काही विकार उद्भवण्याची शक्यता असते. मुलांना … The post मुलांची त्वचा असते खूप संवेदनशील, अशी घ्‍या काळजी... appeared first on पुढारी.

मुलांची त्वचा असते खूप संवेदनशील, अशी घ्‍या काळजी...
Child's Sensitive Skin

डॉ. मनोज कुंभार

लहान मुलांची त्वचा खूप नाजूक आणि संवेदनशीलही असते. त्यांच्या त्वचेची काळजी घेणे हे पालकांच्या दृष्टीने आव्हानच असते. पण थोडी सावधगिरी बाळगली, तर तुमच्या बाळाला त्वचेच्या विकारांपासून सहज दूर ठेवू शकाल. ( Child’s Sensitive Skin )

मुलांना प्रखर सूर्यप्रकाशात वावरू देऊ नका. है महत्त्वाचे आहे. कारण प्रखर उन्हात फिरल्यामुळे त्वचेचे काही विकार उद्भवण्याची शक्यता असते. मुलांना खेळण्यापासून आपण रोखू शकत नाही; पण त्यांना दुपारच्या कडक उन्हात शक्यतो खेळू देऊ नये. दुपारी सावलीत बैठे खेळ खेळण्यास त्यांना सांगावे. सूर्याच्या प्रखरतेचे तोटे त्यांना समजावून सांगावेत. उन्हात जाणे टाळताच येत नसेल तर टोपी तसेच प्रखर उन्हापासून बचाव करणारे कपडे त्यांना घालावेत.

Child’s Sensitive Skin : बाळाची संवेदनशील त्वचा

तान्ह्या बाळाची त्वचा संवेदनशील असते. म्हणूनच त्यांच्यासाठी वापरत असलेली उत्पादने ही त्यांच्यासाठीच बनवलेली आहेत की प्रौढांसाठी, याची खात्री करून घ्यावी. काही उत्पादने खास लहान बाळांसाठी असतात. उदाहरणार्थ, आयव्हरी स्नो लहान बाळासाठी धुण्याचा साबण म्हणून वापरला जातो. लहान मुलांना काही ना काही जखमा होतच असतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. बाळाला लगेच बालरोगतज्ज्ञांना दाखवणे हितकारक ठरते.

Child’s Sensitive Skin :  हात धुणे

जिवाणू आणि संसर्गापासून बचाव बाळाजवळ, मुलांजवळ जाताना नेहमी आपले हात स्वच्छ धुऊन घ्यावेत आणि लहान मुलांनाही व्यवस्थित हात धुण्यास वारंवार सांगावे. यासाठी चांगला साबण वापरावा. कोरोना काळात लागलेली सवय खरे पाहता सदैव कायम ठेवणे आरोग्यदृष्ट्या हिताचे ठरते.

खरूज, नायटा

हा प्रकार किटाणूंमुळे होत नाही. नखांच्या अस्वच्छतेमुळे हे घडते. शरीराच्या वरच्या भागावरील त्वचेवर, हातावर व पायावर लाल रंगाचे आणि गोल आकाराचे चट्टे येतात. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल, मैदानी खेळांत मुले जास्त सहभागी होत असतील तसेच नखे अस्वच्छ राहिल्यामुळे हा संसर्ग होऊ शकतो. त्यावर घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्यानुसार इलाज सुरू करावा.

त्वचेला खोल चरे पडणे

यावर त्वरित इलाज करणे गरजेचे असते. कारण हे त्वचेच्या खालच्या नसांना किंवा रक्तवाहिन्यांना तडे गेल्यामुळे होत असते. जखम झालेल्या ठिकाणी रक्त थांबवण्यासाठी लगेच बर्फ लावावा.

Child’s Sensitive Skin :  भाजणे

मुलांना भाजण्याचे प्रकारही खूप घडतात. अशा वेळी धीर न सोडता भाजलेल्या त्वचेवर उपचार करावेत. त्वचेवर जिथे भाजले आहे तेथे लगेच काहीही लावू नये. मलम किंवा लोशनमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असते. भाजलेल्या ठिकाणची जखम न बांधता उघडीच ठेवावी. यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होईल.

प्रथमोपचारांची माहिती करून घेणे हिताचे

लहान मुले खोड्या करतात, खेळतात त्यामुळे अशा अनेक लहानमोठ्या जखमा त्यांना होत असतात. काही वेळा संसर्गामुळे अंगावर फोड उठतात. पण अशा वेळी त्यांचे योग्य निदान करून उपचार करावेत. काही दुखापत झाली तर डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहेच. पण किरकोळ दुखापतीसाठी लगेच डॉक्टरांकडेही धाव घेण्याची गरज नाही. आपल्या घरातही अनेक औषधी गुण असलेले पदार्थ असतात. त्यांचा प्रथमोपचार म्हणून तरी नक्कीच उपयोग होतो. त्याबाबत नीट माहिती करून घेणे हिताचे ठरते. उदाहरणार्थ, कापल्यामुळे जखम झाली तर त्यावर लगेच हळद घालून वाहणारे रक्त थांबवता येते. थंडीमुळे त्वचा फुटत असेल तर दुधावरील साय, लोणी लावता येते. या उपचारांनी समस्या सुटली नाही, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.

बाळाला स्वच्छ सूर्यप्रकाश मिळायला हवा

लहान बाळाच्या बाबतीत अनेकदा जुन्या परंपरा मोडीत काढल्या जातात. पण त्यामागील शास्त्र समजून घेऊन त्या स्वीकारायच्या की नाही, हे ठरवावे लागेल. पूर्वीच्या काळी प्रसूती झाल्यावर बाळ आणि बाळंतिणीला काही दिवस अंधाऱ्या खोलीत ठेचले जायचे. नंतरच्या काळात ही पद्धत म्हणजे, जुनाट कल्पना आहे म्हणून झिडकारली गेली. बाळाला स्वच्छ सूर्यप्रकाश मिळायला हवा, बाळंतिणीच्या खोलीत उजेड हवा, ही समजूत पक्की होत गेली; पण आता पुन्हा पाश्चात्त्य देशांतच संशोधन झाले आहे की, नवजात बालकाला एकदम उजेडात आणले तर त्याचा त्याच्या त्वचेवर विपरीत परिणाम होतो. अशी अनेक उदाहरणे आहेत. एखादी परंपरा का पाळली जाते त्यामागची कारणमीमांसा लक्षात घेऊन ती पाळायची की नाही, हे ठरवले जावे. बाळाच्या आरोग्याबाबत तरी किमान आंधळेपणाने वागू नये. याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे ठरते.

हेही वाचा : 

 

The post मुलांची त्वचा असते खूप संवेदनशील, अशी घ्‍या काळजी... appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow