राहुरी पोलिसांकडून रोडरोमिओंवर कारवाई

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील मुलींच्या शाळेजवळ टवाळकी करणार्‍या व छेडछाड करणार्‍या रोड रोमीयोंची पोलीस पथकाने धरपकड करत धुलाई करून त्याच्यावर कारवाई केली. यावेळी टवाळखोर तरूणांमध्ये चांगलीच धावपळ उडाली होती. गेल्या काही दिवसापासून राहुरी शहरातील विद्यामंदिर शाळा, भागीरथीबाई शाळा तसेच राहुरी कॉलेज आदी ठिकाणी टवाळखोर रोड रोमीओ शाळा भरतेवेळी व सुटतेवेळी शाळा परिसरात गर्दी … The post राहुरी पोलिसांकडून रोडरोमिओंवर कारवाई appeared first on पुढारी.

राहुरी पोलिसांकडून रोडरोमिओंवर कारवाई

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील मुलींच्या शाळेजवळ टवाळकी करणार्‍या व छेडछाड करणार्‍या रोड रोमीयोंची पोलीस पथकाने धरपकड करत धुलाई करून त्याच्यावर कारवाई केली. यावेळी टवाळखोर तरूणांमध्ये चांगलीच धावपळ उडाली होती. गेल्या काही दिवसापासून राहुरी शहरातील विद्यामंदिर शाळा, भागीरथीबाई शाळा तसेच राहुरी कॉलेज आदी ठिकाणी टवाळखोर रोड रोमीओ शाळा भरतेवेळी व सुटतेवेळी शाळा परिसरात गर्दी करून टवाळकी करीत होते.

यामुळे शालेय व महाविद्यालयीन मुलींना येताना व जाताना यांचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे पालक वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत होती. दिनांक 11 जुलै रोजी सकाळी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलिस नाईक सचिन ताजणे, नदिम शेख, भाऊसाहेब शिरसाट, प्रमोद ढाकणे, प्रवीण आहिरे, आदीनी राहुरी कॉलेज व भागीरथीबाई शाळा परिसरात साध्या वेशात जाऊन टवाळकी करणार्‍या रोड रोमीओची धरपकड करत आठ ते दहा तरुणांना ताब्यात घेतले.
त्यांना राहुरी पोलीस ठाण्यात आणून त्यांची चांगलीच धुलाई करत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या रोड रोमीयोंवर केलेल्या कारवाईमुळे विद्यार्थींनी व पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

नगर : सुप्यातील काळे टोळी हद्दपार ; पोलिस अधीक्षक राकेश ओला यांचा दणका

पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दलात मोठे फेरबदल; २८ पोलिस निरीक्षक, २९ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या  

The post राहुरी पोलिसांकडून रोडरोमिओंवर कारवाई appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow