सेन्सेक्स रॉकेटच्या वेगाने! ६६,०६० वर बंद, जाणून घ्या मार्केटमधील घडामोडी

पुढारी ऑनलाईन : मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी कायम आहे. आज शुक्रवारी सेन्सेक्स ५०२ अंकांनी वाढून ६६,०६० वर बंद झाला. तर निफ्टी १५० अंकांच्या वाढीसह १९,५६४ वर स्थिरावला. आजच्या ट्रेडिंग सत्रात चौफेर खरेदी दिसून आली. विशेषतः आजच्या ट्रेडिंग सत्रात आयटी स्टॉक्स फोकसमध्ये राहिले. (Stock Market Closing Bell) निफ्टीवर टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, LTIMindtree आणि … The post सेन्सेक्स रॉकेटच्या वेगाने! ६६,०६० वर बंद, जाणून घ्या मार्केटमधील घडामोडी appeared first on पुढारी.

 0
सेन्सेक्स रॉकेटच्या वेगाने! ६६,०६० वर बंद, जाणून घ्या मार्केटमधील घडामोडी
Stock Market Closing Bell

पुढारी ऑनलाईन : मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी कायम आहे. आज शुक्रवारी सेन्सेक्स ५०२ अंकांनी वाढून ६६,०६० वर बंद झाला. तर निफ्टी १५० अंकांच्या वाढीसह १९,५६४ वर स्थिरावला. आजच्या ट्रेडिंग सत्रात चौफेर खरेदी दिसून आली. विशेषतः आजच्या ट्रेडिंग सत्रात आयटी स्टॉक्स फोकसमध्ये राहिले. (Stock Market Closing Bell)

निफ्टीवर टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, LTIMindtree आणि HCL Technologies हे सर्वाधिक वाढले, तर एचडीएफसी लाईफ, एम अँड एम, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, टायटन कंपनी आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज हे घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले. आयटी निर्देशांक सुमारे ४ टक्के वाढला. मेटल आणि रियल्टी निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले. यासह सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या चिन्हात बंद झाले.

सेन्सेक्स काल ६६ हजारांवर जाऊन ६५,५५८ वर स्थिरावला होता. आज तो ६५,७७५ वर खुला झाला. त्यानंतर त्याने ६६,१५९ अंकांपर्यंत वाढ नोंदवली. सेन्सेक्सवर टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टाटा स्टील, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, एलटी हे शेअर्स वाढले आहेत. तर पॉवर ग्रिड, एम अँड एम, टायटन, सन फार्मा हे शेअर्स घसरले.

अमेरिकेतील शेअर बाजारात गुरुवारीही तेजी राहिली. नॅस्डॅक (Nasdaq) निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी १ टक्क्यांपेक्षा अधिक वाढला. अमेरिकेतील महागाईत जवळपास तीन वर्षांनी घट झाली आहे. यामुळे अमेरिकेतील बाजारात तेजीचे वातावरण आहे.

दरम्यान, आशियाई शेअर बाजारातील जपानचा निक्केई निर्देशांक ०.०९ टक्क्यांच्या किरकोळ घसरणीसह ३२,३९१ वर बंद झाला. तर टॉपिक्स इंडेक्स ०.१७ टक्क्यांनी खाली आला. (Stock Market Closing Bell)

हे ही वाचा :

The post सेन्सेक्स रॉकेटच्या वेगाने! ६६,०६० वर बंद, जाणून घ्या मार्केटमधील घडामोडी appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow