💥 बालेवाडीतील कोविड 19 केंद्राची पाहणी


कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कोविड-१९ च्या केंद्राला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी सायंकाळी भेट देवून पाहणी केली.
💁‍♂️ पिंपरी चिंचवडचे नवे आयुक्त कोण?
पुढील काळात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास या केंद्राचा कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो. या कामाची माहिती जाणून घेत त्यांनी कोविड केंद्रावर लागणाऱ्या खाटा, सीसीटीव्ही. व आवश्यक  त्या वैद्यकीय सोयी-सुविधांबाबत सूचनाही केल्या. तसेच तेथील विविध ठिकाणांचीही माहिती घेतली.
💥 पुणे शहरात ३१८ नवे रुग्ण
यावेळी कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल, सहायक आयुक्त संदीप कदम, पुणे जिल्हा परिषदेचे  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अजय बेंद्रे, आरोग्य विभागाचे डॉ.शिवाजी  विधाटे व महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वरsponsored vr hearing aid centre