Adsenseबीड । माजलगाव बातम्या
 
माजलगांव तालुक्यातील कवडगांवथडी येथे कोरोना विषाणूचे लागण झालेले 2 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन माजलगांव तालुक्यातील कवडगांव थडी या गावापासून 3 कि.मी. परिसरातील ( कवडगांवथडी, शेलगांवथडी,रिधोरी, भगवाननगर, रामनगर, गव्हाणथडी व सुर्डी नजीक) हा परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. 

त्या पुढील 4 कि.मी. परिसरातील माजलगांव तालुक्यातील वारोळा, टाकरवण, राजेगांव व गेवराई तालूक्यातील तपे निमगांव ही गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात येत आहेत.वरील सर्व गांवे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात येत आहे.

जिल्ह्यात दि 31 मे 2020 रोजीचे रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1)(3) लागू केले आहे. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post