💥 आव्हाड: तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करताहेत


 'करोनाशी लढण्याचं मुंबईनं अवलंबलेलं मॉडेल देशातील सर्वोत्तम आहे. ते देशभर राबवा असं खुद्द आणि आयसीएमआरनं (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) म्हटलं आहे. असं असूनही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत,' असा अप्रत्यक्ष टोला राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांनी भाजपला हाणला आहे.
 ( Lashes Opposition) महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे. दिवसागणिक बाधितांचा आकडा वाढतच आहे. राज्यातील विरोधी पक्ष भाजपनं या मुद्द्यावरून सरकारवर टीका सुरू केली आहे.
 करोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत काही दिवसांपूर्वी भाजपनं आंदोलनही केलं होतं. राज्य सरकारनं विरोधकांचे हे आरोप वेळोवेळी खोडून काढले आहेत. मुंबईत चाचण्यांचं प्रमाण जास्त असल्यानं रुग्णांची संख्या वाढत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. शिवाय, मुंबईत मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येत असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे,
असा सरकारचा दावा आहे. राज्यात आरोप-प्रत्यारोपांचं हे सत्र सुरू असतानाच गुजरात उच्च न्यायालयानं तेथील सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. हाच धागा पकडून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लक्ष्य केलंय. 'गुजरातमधील रुग्णालयांची अवस्था ही अंधार कोठडीपेक्षा बिकट आहे, असं गुजरात उच्च न्यायालयानं म्हटल्याचं आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून निदर्शनास आणलंय. व महाराष्ट्रातील परिस्थिती चांगली असल्याचं सांगताना त्यांनी नीती आयोग व आयसीएमआरचे दाखलेही दिले आहेत. तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत,' असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर