AdsenseCorona Live Update
तालुक्यात साखरे बोरगाव येथे मुंबई (वाशी) येथून एक कुटूंब 22 रोजी गावाकडे परतले आणि काल तेच कुटूंब कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बालाघाटावर खळबळ उडाली.

परंतु ते कुटूंब गावात आल्यानंतर दक्ष समितीच्या दक्षतेने त्या कुटूंबाला गावाच्या बाहेरच होम क्वारंटाईन केले होते.

त्यामुळे ते कोणाच्याच संपर्कात आले नसल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. त्यामुळे दक्ष समितीमुळे गाव कोरोनाच्या संकटापासून वाचल्याने गावकर्‍यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
💥 Corona Live एकाच दिवशी पाच जणांचा बळी

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सतत वाढतच असताना अनेक खेड्यापाड्यात कोरोणा प्रतिबंधात्मक गाव समित्या स्थापन केल्या असून गावात येणारा कोरोना रोखण्यासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत.

साखरे बोरगाव येथेही दक्ष समिती गावकर्‍यांतर्फे नेमण्यात आली. आणि त्याच दक्ष समितीमुळे साखरे बोरगाव कोरोनापासून वाचले.
💁‍♂️ एकाच कुटुंबातील तिघांचा खून; बीड हादरले         
शहरातील अडकलेल्या नागरिकांना गावाकडे जाण्याची सशर्त परवानगी मिळाली व गावाकडे लोंढेच्या लोंढे येऊ लागले. काही आरोग्य तपासणी करून येत होते तर काय चोर मार्गाने दाखल होते.
💥 'त्या' धमकी देणाऱ्या युवकास नाशिक पोलिसांकडून अटक...
त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात 47 कोरोनाचा रुग्णांची प्रशासनाकडे नोंद झाली. याच पार्श्वभूमीवर खेड्यापाड्यातील जनता सतर्क झाली असून अनेक गावात कोरोना प्रतिबंधात्मक समित्या स्थापन झाल्या.
💁‍♂️अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या 1 लाखाच्या उंबरठ्यावर
कोरोनापासून गावाचे रक्षण करण्यासाठी 24 तास गावच्या वेशीवर डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत.

त्याच पद्धतीने साखरे बोरगाव येथील दक्ष समितीच्या दक्षतेने गाव कोरोनाच्या संकटापासून वाचले असल्याने दक्ष समितीचे कौतुक केले जात आहे.


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post