Adsense


ज्येष्ठ साहित्यिक यांच्या निधनाच्या कारणांची चर्चा करणारा, सध्या व्हायरल होत असलेला व्हॉट्सअॅप मेसेज पूर्णपणे खोटा व निराधार असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं आहे. मतकरी यांचे चिरंजीव गणेश मतकरी यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून या संदर्भात सविस्तर खुलासा केला आहे. रत्नाकर मतकरी यांचं नुकतंच निधन झालं. मतकरी यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबाबरोबरच महाराष्ट्रालाही धक्का बसला. त्यांंना करोनाची लागण झाल्याचं निदान झालं होतं. अत्यंत शिस्तप्रिय व आरोग्याची सर्व प्रकारची काळजी घेणाऱ्या मतकरी यांना करोनाची लागण कशी झाली हे कोडं सर्वांनाच पडलं आहे. अशातच रेवती भागवत यांनी व्हॉट्सअॅपवर मतकरी यांच्याबद्दल टाकलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे. मतकरी यांना करोनाची लागण कशामुळं झाली असावी, याबद्दल त्यांनी काही तर्कटं मांडली आहेत. मतकरी कुटुंबाशी आपलं बोलणं झाल्याचा दावाही त्यांनी पोस्टमध्ये केला आहे

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post