Adsense

beed news
⚡ मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातील एका हॉटेलला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

🏬 हॉटेलच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली होती. दरम्यान, या हॉटेलमध्ये वास्तव्याला असणारे 30 डॉक्टर्स थोडक्यात बचावले आहेत. त्यांना या आगीतून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.
💥 बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ
👨🏻‍⚕️ हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेले सर्व डॉक्टर्स जेजे रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांचा उपचार करत होते.

💁‍♂️ या सर्व डॉक्टरांना मरीन लाइन्स येथील धोबी तलाव परिसरातील फॉर्च्युन हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
💻वाढत्या स्क्रीनटाइमवर ठेवा नियंत्रण
👍 सर्व डॉक्टरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांना तत्काळ ट्रायडेंट हॉटेलमध्ये रवाना करण्यात आले आहे.
📃 MHT-CET 2020: अर्जांना १ जूनपर्यंत मुदतवाढ
🚒 दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या तत्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या.

🚿 आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून अग्निशमन दलाच्या वतीने फायर कूलिंगचे काम सुरु आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वरटिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post