👮🏻 दोनच दिवसांत 'एवढ्या' पोलिसांना कोरोनाची लागण !⚡ मुंबईसह राज्यातील पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढतच असून, त्यामुळे पोलीस दलासह त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. गुरुवारपर्यंत राज्यातील पोलीस दलातील कोरोनाबाधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या 1,666 इतकी झाली.
🧐 आष्टी तालुक्यातील सहा गावे कंटेनमेंट झोन घोषित
💁🏻‍♂️ अवघ्या दोनच दिवसांत तब्बल 288 पोलिसांना koronachi लागण झाली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या 17 आहे.
💁‍♂️ पंकजा मुंडेंच्या परळीत सरकारविरोधात आंदोलन नाही
🧐 राज्यात कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 183 अधिकारी व 1483 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्थलांतरित श्रमिकांची ने-आण, दररोजचा बंदोबस्त, तपासणी, चेकनाक्यावरील ड्युटी अशा विविध कामांत अडकलेल्या पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे.
🧐 आष्टी तालुक्यातील सहा गावे कंटेनमेंट झोन घोषित
📌 पोलिसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरीही या विषाणूशी यशस्वी लढा देणाऱ्यांची संख्या 478 झाली आहे. कोरोनाची लक्षणे दिसताच या सर्वांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. परिणामी 35 पोलीस  अधिकारी, 438 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर