👮🏻 किल्लेधारूर परिसरात पाण्याअभावी मोराचा मृत्यू


reporter newspaper beed
धारुर बातम्या : उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे किल्लेधारुर परिसरातील पाणी पातळी खोल गेली आहे. तसेच छोटे-मोठे झरे आटले असून जलस्त्रोतही कोरडे पडले आहेत.
🧐 आष्टी तालुक्यातील सहा गावे कंटेनमेंट झोन घोषित

तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग असल्याने या भागातील वन्य प्राणी व पक्षांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या डोंगराळ भागात मोर, कोल्हे, रान गाई मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
🧐 मास्तरांची ठाण्यात ड्युटी

जलस्त्रोत आटल्याने त्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.पाण्याअभावी प्राण्यांचा जीवही जात आहे. किल्लेधारूर घाट परिसरात असाच एका मोराचा पाण्यासाठी भटकंती करत असताना पाण्याअभावी दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
👮🏻 दोनच दिवसांत 'एवढ्या' पोलिसांना कोरोनाची लागण!

या पक्षी व प्राण्यांसाठी
किल्लेधारुर वनपरिक्षेत्र कार्यालयाने पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठे तयार करुन त्यांची पाण्याची सोय करावी अशी मागणी सामाजिक कार्येकर्ते प्रा.नितीन शुक्ला तसेच प्राणी व पक्षी प्रेमीं नागरिकांकडून केली जात आहे.