🧐 मास्तरांची ठाण्यात ड्युटीबीड जिल्ह्यातील 330 शिक्षकांना जिल्हा परिषदेने आता पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. अगोदर चेकपोस्टवर कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांशिवाय आता काही शिक्षकांना पोलीस ठाण्यातदेखील कर्तव्य बाजवावे लागणार आहे .
🧐 आष्टी तालुक्यातील सहा गावे कंटेनमेंट झोन घोषित
मागच्या आठवड्यापासून बीड जिल्ह्यात कोरोनाचे 35 रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांच्या गावासह तीन किलोमीटर अंतर परिसरातील गावे कंटेनमेंट झोन जाहीर केली जातात. त्यामुळे या गावांत पूर्णवेळ बंद व संचारबंदी असते. त्याचे काम पोलिसांवर वाढले.
🧐 आष्टी तालुक्यातील सहा गावे कंटेनमेंट झोन घोषित
यासाठी पोलीस दलाचे मनुष्यबळ कमी पडत असल्याने आता त्यांना मदतीला शिक्षक द्यावेत, अशी मागणी पोलीस दलाकडून झाली. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी 330 शिक्षकांना पोलिसांच्या सोबतीला दिले आहे.
💁‍♂️ पंकजा मुंडेंच्या परळीत सरकारविरोधात आंदोलन नाही
पोलीस ठाण्याच्या नजीक राहणाऱ्या शिक्षकांच्याच यासाठी नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही येण्या – जाण्याच्या फार अडचणी होणार नाहीत. या शिक्षकांना केवळ नाकाबंदी व चेकपोस्ट या ठिकाणीच काम करावे लागणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचे कुठलेही काम शिक्षकांवर सोपविले जाणार नाही.
👮🏻 दोनच दिवसांत 'एवढ्या' पोलिसांना कोरोनाची लागण!
मात्र जिल्हा परिषदेचे 330 शिक्षक पोलिसांच्या सोबतीने काम करणार आहेत. या शिक्षकांना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नसलेल्या ठिकाणीच कामे दिली जाणार आहेत. नाकाबंदी व चेकपोस्ट आदी ठिकाणी आता हे शिक्षक पोलिसांना मदत करणार आहेत. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सुरवातीला संचारबंदी व नंतर लॉकडाउन जाहीर करण्यात आले.


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर