Adsenseदारव्हा यवतमाळ : गावात एखादी मुलगी आली रे आली की, गावातील मुलांची नजर तिच्यावर जाते. मग सलगी वाढविण्यासाठी हे दिवाने प्रयत्न करतात. सतत मुलीच्या मागे लागतात. तिला आकर्षित करण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून करण्यात येतो. सतत स्टाईल मारण्यापासून कोणतेही काम करून देण्यासाठी तयार असतात. अशीच एक अल्पवयील मुलगी सुटीत मामाच्या घरी राहायला गेली. मात्र, गावातील युवकाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि गर्भवती (Pregnant) केले. त्या अल्पवयीन मुलीने गोंडस बाळाला जन्म दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन मुलगी सुटीच्या दिवसांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्‍यातील लोही येथे राहणाऱ्या मामाच्या घरी राहायला आली होती. दिसायला सुंदर असणाऱ्या मुलीला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी व बोलण्यासाठी  युवक सतत मामाच्या घरी चकरा मारीत होते. यातील एका युवकाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

युवकाच्या आमिषाला बळी पडल्यानंतर तिने सर्वस्व वाहून दिले. सात जून ते 31 ऑगस्ट 2019 पर्यंत दोघांनी सतत शारीरिक संबंध प्रस्थापिक केले. सतत ठेवलेल्या शारीरिक संबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. यानंतर मुलगी कुटुंबासह कामानिमित्त पुणेला गेली. तिथे कुटुंबीयांनी तिची प्रसूती केली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. यानंतर पुणे (Pune)येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

👩🏻‍⚖️मुलीच्या तक्रारीवरून दारव्हात गुन्हा दाखल

मामाच्या घरी सुटीत आलेल्या अल्पवयीन मुलीला गावातील युवकाने प्रेमजाळ्यात ओढून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यात गर्भवती राहिलेल्या मुलीने मुलाला जन्म दिला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून लोही येथील तरुणाविरुद्ध दारव्हा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post