🧐 आष्टी तालुक्यातील सहा गावे कंटेनमेंट झोन घोषित


आष्टी  बातम्या :आष्टी तालुक्यातील धनगरवाडी (पिंपळा) येथे शुक्रवारी (दि.22) रोजी कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी धनगरवाडी (पिंपळा), पिंपळा, काकाडवाडी, नांदूर, खरडगव्हाण, सोलापूरवाडी कंटेनमेंट झोन घोषित केले आहे.
🧐 आष्टी तालुक्यातील सहा गावे कंटेनमेंट झोन घोषित
कोरोना रुग्ण आढळलेल्या परिसरातील तीन कि.मी.चा परिसर कंटेनमेंट झोन तर त्यापुढील चार कि.मी.चा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात येतो. कंटेनमेंट झोन घोषित केलेले गावे आता पुढील अनिश्चित काळासाठी पुर्णवेळी बंद असणार आहेत. म्हणजेच या गावात संचारबंदी असणार आहे.
💁‍♂️ पंकजा मुंडेंच्या परळीत सरकारविरोधात आंदोलन नाही
जिल्हाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे की, राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी 31 में 2020 पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक 31 में 2020 रोजीचे रात्री 12.00 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1)(3) लागू करण्यात आले आहेत.
💥 आयसीएमआरचे पथक बीड जिल्ह्यात दाखल एम
तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर