👯🏻‍♀️ TIK TOK सिद्दीकीचे अकाऊंट बॅन Ban

👯🏻‍♀️ दिवसेंदिवस टिक-टॉकची लोकप्रियता कमी होत चालली आहे. आज प्ले स्टोअरमध्ये टिक टॉकचे रेटिंग 1.3 वर आले आहे. अनेकांनी हे अॅप डिलिट केली आहे.  टिक टॉक  फैजल सिद्दीकीचे अकाऊंट बॅन करण्यात आले आहे.  फैजलने त्याच्या अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत  तो एका मुलीवर पाणी (अ‍ॅसिड म्हणून) फेकतो. तू दुस-या मुलासाठी मला सोडले ना? असे तो मुलीला म्हणतो. यानंतर व्हिडीओतील मुलगी लाल मेकअपमध्ये दिसते. तिचा चेहरा अ‍ॅसिडने पोळलेला आहे हे दाखवण्यासाठी या लाल रंगाच्या मेकअपचा वापर केला आहे.  फैजलने हा व्हिडीओ शेअर केला आणि तो नेटक-यांच्या निशाण्यावर आला होता. या घटनेनंतर ट्विटरवर ‘#BanTiktok’ हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता. 

👩🏻‍⚖️ राष्ट्रीय महिला आयोगाकडे या व्हिडीओची तक्रार दाखल करण्यात आली होती.याची दखल घेत 13 फॉलोवर्स असलेले फैजलचे अकाऊंट बॅन करण्यात आले आहे. 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर