💁‍♂️ जिल्हा परिषदेत सोशल डिस्टन्सची पायमल्ली


 बीड बातम्या: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागु केला आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणे हे महत्त्वाचे असले तरी काही सुजान, सुशिक्षीत लोकच सोशल डिस्टन्सची पायमल्ली करतांना दिसत आहेत.

विशेष म्हणजे वैयक्तिक कामासाठी शासकीय कामाचा आधार घेवून जिल्हा परिषद शिक्षण विभागात गर्दी होत असल्याने निदर्शनास आल्यानंतर चक्क शिक्षणाधिकारी यांनी पत्र काढून विनाकारणची गर्दी करू नका, असे ठणकावले आहे.
💁‍♂️ 60 दिवसांच्या विश्रांतीनंतर अखेर लालपरी धावणार..!
जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी अजय बहिर यांच्या निदर्शनास आले की, जिल्हा परिषद प्राथमिक विभागातील सहशिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख व शिक्षक काही कर्मचारी आपले वैयक्तिक कामासाठी कार्यालयात येवून गर्दी करत आहेत.
💁‍♂️ पंकजा मुंडेंच्या परळीत सरकारविरोधात आंदोलन नाही
त्यामुळे सोशल डिस्टन्सचे तीनतेरा झाल्याचे दिसून आले. यासंदर्भात शिक्षणाधिकारी यांनी विलंब न करता पत्राद्वारे सर्व गटशिक्षणाधिकारी यांना कळविले आहे. तसेच आपल्या कार्यालयाचे टपाल, प्रस्ताव परिचरच्या हस्ते सादर करावे. वर्ग-३,४ च्या कर्मचार्‍याची सदर कामाकरिता नियुक्ती करावी.
💥 आयसीएमआरचे पथक बीड जिल्ह्यात दाखल एम
वर्ग-३,४ च्या कर्मचार्‍या व्यतिरीक्त आपल्या स्वाक्षरीचे टपाल, प्रस्ताव कर्मचार्‍यासोबत इतर कोणी आल्यास व मुख्यालयास पाठविल्यास त्यांच्याविरूद्ध साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल.

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर