Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


अहमदनगर बातमी: अहमदनगर येथील गणराज प्रकाशन प्रकाशित व नाट्यलेखक अनिल देशपांडे लिखित प्रिया या स्त्री प्रधान नाटकाचा पुस्तक प्रकाशन सोहळा संगमनेर येथे १८ मार्च रोजी होणार आहे, अशी माहिती प्रकाशक लक्ष्मण भगत यांनी दिली.
प्रियाः हे नाटक तरुण-तरुणींच्या मनातील भाव-भावना मांडणारं हृदयस्पर्शी नाटक असून या नाटाकाचा पुस्तक प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक प्रा. शाम शिंदे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेर येथील शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी हे आहेत.
या नाट्यकृतीचा पुस्तक प्रकाशन सोहळा बुधवार, दि. १८ मार्च २0२0 रोजी मालपाणी हेल्थ क्लब, केशर हॉल, कासारवाडी, अकोले रोड, संगमनेर येथे संपन्न होणार आहे. यावेळी नाट्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन लेखक अनिल देशपांडे व गणराज प्रकाशनाचे प्रा. ग. ल. भगत यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post