Adsense


औरंगाबाद जिल्ह्यात आज सायंकाळपर्यंत 33 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 22 पुरूष, 11 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 5007 कोरोनाबाधित आढळले असून 2446 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

247 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2314 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (29) : 

सादात नगर (1), एन चार सिडको (2), सिंधी कॉलनी (1), जय भवानी नगर, एन चार सिडको (1), एन चार समृद्धी नगर, सिडको (1), जय भवानी नगर, एन चार सिडको (2), एन सात, सिडको पोलिस स्टेशन जवळ, सिडको (3),  एन चार सिडको (1), सराफा रोड (4),  गारखेडागाव (1), सातारा परिसर (1), एन नऊ (1), मुकुंदवाडी, रोहिदास नगर (1), लोटा कारंजा (1), साई नगर, गारखेडा (1), द्वारकापुरी, उस्मानपुरा (1), न्यू मोंढा, गोकूळ नगर (1), श्रीगणेश रेसिडन्सी, चिकलठाणा (2), शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी (1), बँक कॉलनी, गारखेडा (2),

ग्रामीण भागातील रुग्ण (4) : 

चिंचबन कॉलनी, बजाज नगर (1) साई श्रद्धा पार्क, बजाज नगर (2), शिवाजी नगर, गंगापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post