Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


1. मेष : करमणुकीत अधिक वेळ घालवाल. सकस आहार घ्यावा. सामुदायिक बाबींमध्ये फार लक्ष घालू नका.

2. वृषभ : घरगुती वातावरण प्रसन्न राहील. तुम्ही जबाबदारी उत्तम रित्या पेलू शकाल. कौटुंबिक वातावरणाचा मनमुराद आनंद घ्याल.

3. मिथुन : आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. काही कामे रखडल्यासारखी वाटू शकतात. क्षणिक आनंदाने हुरळून जाल.

4. कर्क :  व्यापार्‍यांना चांगला लाभ संभवतो. मनावरील दडपण दूर करण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील.

5. सिंह : दिवस मनाजोगा व्यतीत कराल. इतरांवर तुमच्या व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव पडेल. कामात अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल.

6. कन्या :  मतभेदा पासून चार हात दूर रहा. विचारांना योग्य दिशा द्यावी. नवीन योजना तयार ठेवाव्यात.

7. तूळ : दिवस चांगल्या आर्थिक लाभाचा असेल. केलेली गुंतवणूक योग्य वेळी कामी येईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल.

8. वृश्चिक : क्रोध भावनेला आवर घालावा. मुलांच्या स्वतंत्र वृत्तीचा विचार करावा लागेल. कामाच्या ठिकाणी सन्मानास पात्र व्हाल.

9. धनु : कौटुंबिक वातावरण तप्त राहील. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आततायीपणे कोणताही निर्णय घेऊ नका.

10. मकर : अचानक धनलाभाची शक्यता. मनात नसत्या शंका आणू नका. भावंडांशी खटके उडण्याची शक्यता.

11. कुंभ : नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करा. जवळच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील.

12. मीन : कामात क्षुल्लक अडचण येऊ शकते. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. सहकार्‍याकडून मदतीची अपेक्षा ठेवू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post