Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


1. मेष : केलेल्या कामातून समाधान मिळेल. योग्य तर्क वापरता येईल. आपले विचार चलाखीने मांडाल.

2. वृषभ : गोड बोलण्यावर अधिक भर द्याल. सांपत्तिक दर्जा सुधारेल. कमिशनमधून चांगली कमाई होईल.

3. मिथुन : बौद्धिक हटवादीपणे वागणे राहील. तत्परतेने कामे करण्यावर भर द्याल. जबाबदारीचा एकंदर आवाका लक्षात घ्यावा.

4. कर्क : सरकारी कामात अधिक वेळ जाईल. मनातील निराशाजनक विचार दूर करावेत. आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शनाखाली करावी.

5. सिंह : तरूणांशी मैत्री कराल. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्यावा. वरिष्ठांच्या संपर्कात राहाल. चारचौघांत तुमच्या गुणांचे कौतुक केले जाईल.

6. कन्या : आपल्या आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. बुद्धिचातुर्याने कामे करण्यावर भर द्याल. व्यवहारात चतुरता दाखवून द्याल.

7. तूळ : अत्यंत कुशलतेने वागाल. तुमच्या वक्तृत्वावर लोक प्रभावित होतील. प्रवासाची आवड पूर्ण होईल.

8. वृश्चिक : कफ विकाराचा त्रास संभवतो. मनातील इच्छेला मुरड घालू नका. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते.

9. धनु : तुमचा बौद्धिक कस लागू शकतो. मनाची द्विधावस्था टाळण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराविषयी मनात गैरसमज बाळगू नका.

10. मकर : इतरांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करावा. वादाच्या मुद्दयात सहभाग घेऊ नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

11. कुंभ : तुमचे बुद्धी-कौशल्य पणाला लागू शकते. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करावा.

12. मीन : गप्पागोष्टी करण्यात अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल. 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post