Adsense


जिल्ह्यातील 22 मे पासून सुरू झालेली सलूनची दुकाने लॉकडाऊनच्या नवीन नियमावली नुसार पुन्हा बंद करण्यात आली आहेत. हा नियम 30 जूनपर्यंत लागू असणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील लॉकडाऊनची नवीन नियमावली रविवारी रात्री घोषित केली आहे.
नवीन नियमानुसार सलून बरोबरच ब्युटी पार्लर, स्पा, आठवडे बाजार, आंतरजिल्हा बस वाहतूक, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, आदरातिथ्य सेवा धार्मिक स्थळे आदी गर्दीच्या ठिकाणी बंद राहणार आहेत.
व्यवहारांना परवानगी दिली असून सर्व दुकानांची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशी राहणार आहे. तसेच पूर्वीपेक्षा फिरण्यासाठी चार तास वाढवून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सायंकाळी सातऐवजी रात्री नऊपर्यंत आता फिरायला मोकळीक राहणार आहे. ते आता चार तासांनी शिथील केले असून रात्री नऊपर्यंत फिरण्यास मोकळीक राहणार आहे. पूर्वी सकाळी सातनंतर फिरता येत होते, आता सकाळी पाचपासूनच फिरता येणार आहे. मॉर्निंग वॉकला परवानगी दिल्याने ही वेळ वाढविण्यात आली आहे.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post