Adsense


⚡ कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबधितांच्या आकड्याने 600 चा टप्पा पार केला आहे. सुदैवाने आज दिवसभरात एकाही नव्या रुग्णाची नोंद करण्यात आलेली नाही.
👉 त्यामुळे कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कोल्हापुरातील कोरोनाबाधितांचा आकडा 607 वर पोहोचला आहे. तर सहा जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
🏥 कोल्हापुरात 607 कोरोना रुग्णांपैकी 464 लोकांवर कोरोना वॉर्डात उपचार सुरू आहेत. तर 137 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली.

😷 कोल्हापुरातील पाच तालुक्यात 50 पेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक 155 रुग्ण हे शाहूवाडी तालुक्यात आहेत.
📍 तर त्यापाठोपाठ भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड यासह अनेक तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे.🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post