Adsense


1. मेष : दिवस समाधानात जाईल. होकारात होकार मिसळावा लागेल. प्रसंगातील अनुकूलता लक्षात घ्यावी.

2. वृषभ : प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. नियमांना सोडून वागू नका. फसव्या मित्रांपासून सावध राहावे.

3. मिथुन : काही वेळेस तारेवरची कसरत करावी लागू शकते. हातातील चांगली संधि सोडू नका. नियोजन करून कामे करावीत.

4. कर्क : कामाच्या ठिकाणी चिडचिड वाढू शकते. एकमेकांच्या सहकार्याने कामे करावीत. परदेशी कामातून लाभ संभवतो.

5. सिंह : शक्यतो अकारण होणारे गैरसमज टाळावे लागतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. कोणत्याही गोष्टीची जास्त चिकित्सा करत बसू नका.

6. कन्या : आत्मसंयमन करावे लागेल. अति धाडस करायला जाऊ नये. स्वयं शिस्त पाळणे आवश्यक आहे.

7. तूळ : जोडीदाराला अचानक लाभ होईल. जवळच्या लोकांना दुर्लक्षित करू नका. बेफिकिरीने वागून चालणार नाही.

8. वृश्चिक : दिवसभर कार्यरत राहावे लागेल. भाऊबंदकीत वाद संभवतात. वाहन चालवताना सतर्क रहा.

9. धनु : आज मनाप्रमाणे वागण्याचे ठरवाल. खेळाडूंनी कसरतीत कसूर करू नये. थोड्याशा यशाने उतू नका.

10. मकर : सध्याच्या परिस्थितीत बिनधास्त वागून चालणार नाही. अध्यापक वर्गावर जबाबदारी वाढू शकते.

11. कुंभ : दूरच्या व्यवहारात सावधानता बाळगावी. आततायीपणे वागून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टींवर वाद घालू नका.

12. मीन : थोडी आक्रमक भूमिका घ्याल. स्त्री वर्गावरून वादाचा प्रसंग येऊ शकतो. कामात भावंडांची सहकार्य घेता येईल. 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post