😰 अभिनेता सुशांतचा जीवन प्रवास... Actor Sushant's life journey ...


💁‍♂️ छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची सुरुवात करून मोठ्या पडद्यावर यशाची शिखरे गाठणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरी आत्महत्या केली आहे.

🧐 बॉलिवूडच्या या अभिनेत्याचा आजपर्यंतचा प्रवास

● बिहारमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात 21 जानेवारी 1986 साली सुशांतचा जन्म झाला. सुशांतने दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधुन मॅकेनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले..

● सुशांतने डान्सरच्या रुपात आपल्या करिअरला सुरुवात केली होती. झी टीव्हीच्या गाजलेल्या 'पवित्र रिश्ता'मधून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली.

● 'पवित्र रिश्ता' या मालिके दरम्यान, अभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत त्याची केमिस्टी जुळली. परंतू काही वर्षांनंतर दोघांचे ब्रेकअप झाले. परंतू या अफेयरमुळे तो खुप चर्चेत राहिला.

● पवित्र रिश्ता या मालिकेला ब्रेक देत सुशांतने 'काई पो छे' या सिनेमाव्दारे बॉलिवूडमध्ये इंट्री करत स्वतःची हीरो म्हणून ओळख निर्माण केली.

● 'काई पो छे' या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता.

● यानंतर 2013 सालीच आलेल्या परिणीता चोप्रा सोबतचा शुद्ध देसी रोमान्स, 2014 ,साली आलेला पीके या चित्रपटांनी सुशांतच्या हिरो होण्यावर शिक्कामोर्तब केला.

● 2016 साली क्रिकेटर धोनीच्या जीवनावर आधारीत एम.एस धोनी द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट विशेष चर्चेत राहिला.

🎞️ त्यानंतर सुशांतने वेलकम टू न्यूयॉर्क, छिचोरे, दिल बेचारा, डिटेक्टिव्ह बोमकेश बक्षी, केदारनाथ, सोनंचिरिया या चित्रपटांमधून अभिनय केला आहे.

😥 अशा या नावाजलेल्या अभिनेत्याच्या अशा अचानक जाण्याने बॉलिवूड जगताला मोठा धक्का बसला आहे.