Adsense


ती संध्याकाळ सुरेख होती,
अलगद पावसात बोचणारी थंडी होती
कपडे चिंब पण फिकर नव्हती,
कारण पावसात सोबत तू होती,

ती संध्याकाळ सुरेख होती,
माती सुगंध पसरवत होती
गुढग्याभर पाण्यात वाट नव्हती,
पण त्या पावसात तुझी साथ होती,

ती संध्याकाळ सुरेख होती
टीप टीप थेंबाची गाणी होती
गाणी ऐकायची खरंच इच्छा नव्हती
कारण पावसात तू माझ्या कानी होती...

आजही ती संध्याकाळ खटकते,
मन आजही पावसात खूप रडते..
पावसाचे पाणी तर तेच असते..
त्या संध्याकाळची तू मला आठवते ...
ती संध्याकाळ खरंच खूप सुरेख होती
कारण पावसात भिजणारी सोबत तू होती..

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post