Adsense


⚡ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी काम करणाऱ्या दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती हाती आली आहे. या दोघांना रुग्णालयात दाखल केले आहे.

💁‍♂️ काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या ताफ्यातील तीन सुरक्षा रक्षकांना व दोन चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

🏥 त्यापैकी चालकांवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असून सुरक्षा रक्षक कोरोनामुक्त झाले आहेत.

💫 त्यामुळे धोका टळला असे वाटतानाच आता मनसे अध्यक्ष राज यांच्या घरी काम करणाऱ्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मनसैनिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

📌 काही दिवसांपूर्वी कृष्णकुंजपासून काही अंतरावर असणाऱ्या शिवसेना भवनातही कोरोनाचा शिरकाव झाला होता. यानंतर शिवसेना भवनात सॅनिटायझेशन प्रक्रीया केली होती. शिवसेना भवन एका आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post