Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


👉 चीनने भारतीय सैन्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेधार्थ शहर शिवसेनेने दिल्ली दरवाजा येथे निषेध आंदोलन केले होते.

👉 दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी आमदार अनिल राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह २५ जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

👉 सहायक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी फिर्याद दिली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.

👉 भादंवि कलम 144 अन्वये सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होण्यास मनाई करण्यात आली आहे.

👉 दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात काही दिवसापूर्वी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांवर नियमांचा भंग केल्याने गुन्हे दाखल झाले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post