Adsense


नगर शहरात गेल्या सात दिवसांत 25 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तीन कंटेनमेंट झोन झाले असून, शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहेत.
[  The crowd grew, the danger to the city increased!  ]
शहरात कोरोनाला प्रादूर्भाव मुकुंदनगर या उपनगरापासून सुरू झाली. त्यानंतर झेंडीगेट येथे रुग्ण आढळला. त्यानंतर सारसनगरमधील शांतीनगर, सथ्था कॉलनी, मार्केटयार्ड येथील भवानीनगर परिसर, कोठी परिसर, स्टेशन रोड, केडगाव, माळीवाडा येथे रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या सात दिवसात या रुग्णांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. हा आकडा वाढतो की काय अशी भीती वाटते आहे. दरम्यान, नियमानुसार आता कंटेनमेंट झोनच राहणार आहे. त्यातच बाजारपेठ ही सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत खुली राहणार आहे.

पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पावसाळी कामे उरकरण्यासाठी बाजारात खरेदी-विक्रीला तेजी आली आहे. यामुळे बाजारात गर्दी वाढली आली. दिवसेदिवस या वाढत्या गर्दीला कोरोना प्रादूर्भावाचा विसर पडला असल्याचेच दिसते आहे.

त्यामुळे सामाजिक अंतराच्या नियमाचा देखील गर्दीला विसर पडल्याचे दिसते आहे. या नियमांची अंमलबाजवणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस दलावर त्याची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे.

परंतु त्यांच्याकडील तोडक्या मनुष्यबळामुळे या नियमाचा देखील गर्दीला विसर पडला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भावाचा धोका अधिक वाढला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post