Adsense


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) 21 जून रोजी सकाळी 7.45 वाजता मुकुंवाडीतील संजय नगर येथील 71 वर्षीय पुरूष रुग्णाचा, सकाळी 10.45 वाजता बायजीपुऱ्यातील इंदिरा नगरातील 66 वर्षीय पुरूष आणि दुपारी 12.10 वाजता एन आठ मधील यशोधरा कॉलनीतील 48 वर्षीय पुरूष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घाटीमध्ये  143 कोरोनाबाधित रुग्णांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात 140 कोरोनाबाधित रुग्ण वास्तव्यास होते.
तर शहरातील एका खासगी रुग्णालयात 21 जून रोजी सकाळी 8.30 वाजता न्यू बायजीपुऱ्यातील इंदिरा नगर, गल्ली क्रमांक 21 येथील 65 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 140, औरंगाबाद शहरातील  विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 50, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 191 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post