Adsense


धारुर येथे एक परजिल्ह्यातून आलेला कोरोनाग्रस्त आढळल्याने अख्खे शहरच जिल्हाधिकार्‍यांनी सील केले आहे. परंतु कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील व्यक्तींसह अन्य असे एकूण 40 स्वॅबही निगेटिव्ह आल्याने धारुरकरांचं सध्याचं टेन्शन मिटलं असले तरी शहरातील पूर्णवेळ संचारबंदी शिथिल केल्याशिवाय दिलासा मिळू शकणार नाही.
कोरोनाग्रस्त व्यक्ती अनेकांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कात आला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी अख्खे शहर सील करत पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे. याचा मोठा फटका तालुक्याला बसला आहे. अशात संपर्कात आलेल्या व अन्य अशा एकूण चाळीस व्यक्तींचे स्वॅब केज, अंबाजोगाई येथून लातूरच्या स्व.विलासराव देशमुख शासकीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आले होते.
त्या केजच्या उपजिल्हा रुग्णालयातून 22 तर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून 18 असे एकूण 40 स्वॅब पाठविले होते. सर्वच स्वॅब निगेटिव्ह आल्याने धारुरकरांची तुर्तास चिंता मिटली असली तरी शहरातील पूर्ववेळ संचारबंदी शिथिल केल्याशिवाय दिलासा मिळणार नाही.टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post