Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


👉 खाजगी कोवीड रूग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने मदत कक्षाची स्थापना केली आहे.

👉 सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मानकानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील कमलनयन बजाज रूग्णालय , डॉ.हेगडेवार रुग्णालय, एम.जी.एम.रूग्णालय, सेठ नंदलाल धूत रुग्णालय या चार खाजगी रुग्णालयांना डेडिकेटेड कोवीड रूग्णालय म्हणून घोषित केले आहे.

👉 या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविडचे रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांचाही समावेश आहे. त्यांच्याकरीता मदत कक्ष स्थापन करण्यासाठी महसूल यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.   

👉 त्यानुसार कमलनयन बजाज रूग्णालयात श्रीमती योगिता खटावकर ,श्री.रामेश्वर लोखंडे , डॉ.हेगडेवार रुग्णालयात श्री.प्रमोद गायकवाड, श्रीमती कविता गडप्पा, एम.जी.एम.रूग्णालयात श्री.एस.एम.सोळोख,श्री.अरविंद धोंगडे आणि सेठ नंदलाल धूत रुग्णालयात श्री.सुनील गायकवाड, श्री.प्रदिप आखरे यांची पथक प्रमुख म्हणून  नियुक्त करण्यात आली आहे. 

👉 या आदेशान्वये  संबंधितांनी  उपरोक्त रुग्णालयांच्या प्रथमदर्शनी भागात मदत कक्षाची स्थापन करावयाची आहे. त्याद्वारे येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना  सर्वतोपरी मदत व आवश्यक माहिती  उपलब्ध करून देण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. मदत कक्ष सकाळी सात ते रात्री नऊ यावेळेत सुरू राहील.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post