Adsense


कर्जत:तालुक्यातील चिंचोली काळदात कॉरंनटाईन केल्याच्या रागातून गावच्या महिला सरपंच वंदना धनराज उबाळे वय ३२ यांना मारहाण करण्यात आली आहे.याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यासाठी शासनाने कोरोना दक्षता समिती स्थापन केली आहे.यामध्यामातून बाहेगावाहून आलेल्या लोकांना विलनिकरण लक्षात ठेवणे बंधकारक असते या समितीचे अध्यक्ष सरपंच असतो.
 [The female sarpanch of the village was beaten out of anger at the quarantine]
५ जून रोजी रात्री सात वाजता बाळासाहेब राम वाघमारे ,युवराज पांडुरंग आखाडे या दोघांनी सरपंच उबाळे यांना विचारणा केली की आमच्या नातेवाईकांना विलनिकरण कक्षात का ठेवले व तुमचे नातेवाईक आल्यावर त्यांना गावात राहून का दिले असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली.

सरपंच वंदना उबाळे यांच्या फिर्यादीवरून या दोघा विरोधात कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपी बाळासाहेब वाघमारे यास अटक केली आहे.टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post