Adsense


टेम्पोमध्ये सुंगधी तंबाखूची वाहतूक करून ती नगर शहरात विक्री करण्यासाठी घेऊन येणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले.

नगर शहरातील रेल्वे ब्रीज जवळ ही कारवाई केली. सफल संतोष जैन (रा. भूषणनगर, नगर), अशोक भिमसेन ठुबे (रा. नगर) या दोघांना अटक केली आहे.

त्यांच्याकडून तीन लाख ६० हजार रुपयांची सुगंधी तंबाखू, टेम्पो य व इतर साहित्य असा पाच लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नगर शहरातील भूषणनगर भागात ताराबाग काँलनीमध्ये सुगंधी तंबाखू घेऊन येत असल्याची माहिती सोमवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती.

त्यानुसार निरीक्षक पवार यांनी पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, पोलीस शिपाई रणजित जाधव यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार ही कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post