Adsense


👉 कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने चाचण्यांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी १२ कोटी ४४ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आज (शुक्रवारी) उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी दिली.

👉 विभागीय आयुक्त कार्यालयातील 'झुंबर हॉल' मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 'कोरोना' संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

👉 या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ,  डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, आदी उपस्थित होते.

👉 यावेळी अजित पवार म्हणाले, कोवीड-१९ स्त्राव नमुना तपासणीसाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीसाठी ८ कोटी ९० लाख ९७ हजार रुपयांचा तर यंत्रसामुग्रीसाठी ३ कोटी ५३ लाख ६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

👉 याशिवाय इतर आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी ७ कोटी १५ लाख ८१ हजार रुपयांचा निधीही देण्यात आला आहे.

👉 या निधीतून कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक वैद्यकीय साधन सामुग्रीची खरेदी करता येणार आहे. याशिवाय परिसेविका व अधिपरिचारिकांच्या भरण्यात आलेल्या पदासाठी आवश्यक निधी देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post