😍 Happy Birthday ! शिल्पा शेट्टी....


👩🏻 दोन दशकांपेक्षा जास्त आपल्या अदाकारीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज वाढदिवस.

🎂 8 जून 1975 मध्ये रोजी जन्मलेल्या शिल्पाचा आज 45 वा वाढदिवस आहे.

🎞️ 'बाजीगर’ या सिनेमातून बॉलिवूड करिअरला सुरुवात करणाऱ्या शिल्पा शेट्टीने जवळपास 40 सिनेमे करत बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले.

🧘🏻‍♀️ बॉलिवूमध्ये अनेक हिट सिनेमा दिलेली शिल्पा सध्या मोठ्या पडद्यापासून लांब असली तरीही तिच्या फिटनेसमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

🏃🏻‍♀️ बाॅलिवूडमध्ये फिटनेससाठी शिल्पा शेट्टी प्रसिद्ध आहे. ती नेहमीच तिच्या सोशल मीडियावर तिच्या फिटनेस आणि योगाचे व्हिडिओ शेअर करताना दिसते. त्यामुळे तिच्या फिटनेसबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

🏋🏻 वर्कआउट : स्वत:ला छान ठेवण्यासाठी शिल्पा रोज व्यायाम करते. त्यात कार्डिओ, स्ट्रेन्थ ट्रेनिंग आणि योगही आहे. पाच दिवस ती जिममध्ये जाते आणि दोन दिवस योगाला देते.

🥗 आहार : तणावापासून दूर राहण्यासाठी शिल्पा रोज 10 मिनिटं मेडिटेशन करते. दिवसाची सुरुवात ती आवळा आणि ओलिवरा ज्युसचं करते. जेवणात ऑलिव्ह ऑइल वापरते. शिवाय जास्त करून ती शाकाहारी अन्न घेते.

▪️ योग आणि वर्कआऊटनंतर ती प्रोटिन शेक घेते. शिल्पा खूप फुडी आहे त्यामुळे आठवड्यातून एकदा मात्र ती बाहेरचं खाणं पसंत करते.

▪️ शिल्पा नाश्त्याला 1 बाऊल दलिया खाते आणि ग्रीन टी पिते. जेवणात रोटी, चिकन, भाज्या असतात.

💁🏻  शिल्पाचे आयुष्य :
👉 शिल्पानं 2009 मध्ये प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्राशी लग्न केलं असून या दोघांना विहान हा एक मुलगा सुद्धा आहे.

👨‍👩‍👧‍👧 फार कमी लोकांना माहित आहे की शिल्पा ही राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे. राजच्या पहिल्या पत्नीचं नाव कविता असून तिच्यापासून त्याला देलिना ही 12 वर्षांची मुलगी आहे.