आहे एक मैत्रीण माझी, Has a girlfriend of mine,


आहे एक मैत्रीण माझी,
माझ्या कवितांवर प्रेम करणारी...
माझ्या शब्दांना समजणारी...

आहे एक मैत्रीण माझी,  
मला रोज सकाळी Massage करणारी... 
पिल्लु, स्वीटहार्ट, म्हणून झोपेतून उठवणारी...

आहे एक मैत्रीण माझी,
मला समजून घेणारी...
माझ्या डोळ्यातले दुःख,
सहजपणे वाचणारी...

आहे एक मैत्रीण माझी, 
माझ्यावर हक्काने रुसणारी...
आणि मी फनी फेस केल्यावर,
माझ्यावर खुदु खुदु हसणारी...

आहे एक मैत्रीण माझी,
माझ्या सोबत निर्धास्त चालणारी... 
बरसणाऱ्या पावसात माझी सोबतीन बनणारी...

आहे एक मैत्रीण माझी,
Good & Cute दिसणारी...
आनंद झाल्यावर,
मला घट्ट मिठीत घेणारी...
आहे एक मैत्रीण माझी...