Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी येथील सुशिक्षित युवकाला नोकरीचे अमिष दाखवून पाच लाख रुपयाला फसवल्याची घटना घडली आहे.

मोहटादेवी गडावरील विशाल राजेंद्र गोरे पुजासाहीत्य विक्री करणा-या सुशिक्षित बेरोजगाराला गंडा घातला आहे.
२०१४ सालापासुन चाललेली ही फसवणुक आता जीवघेणी ठरत आहे. नोकरीही नाही व पैसेही नाहीत अशी अवस्था युवकाची झाली आहे.
He cheated the youth of Rs 5 lakh by showing him the lure of a job
मोहटादेवी येथे भक्त म्हणुन आलेल्या बाळु अर्जुन चव्हाण रा. बळवंत काँलनी पिंपरी -चिचंवड याने नोकरीला लावतो म्हणुन गोरे याची पाच लाख रुपयाची फसवणुक केली आहे. याबाबत पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
चव्हाण हा मोहटादेवीच्या दर्शनासाठी २०१४ साली आला होता. त्यावेळी ओळख झाली आणि तु डीएड झाला आणि असा उद्योग करतो अशी विचारपुस करुन मी तुला एका मित्राच्या संस्थेत शिक्षकाची नोकरीला लावतो.
त्यानंतर विशाल गोरे यांनी टप्पा टप्पाने तीन वेळा ही रक्कम चव्हाण याला एकूण पाच लाख रुपये देवुनही सहा वर्षे होवुन गेले तरी नोकरी दिली नाही व पैसेही परत दिले नाहीत म्हणुन विशाल गोरे यांनी पाथर्डी पोलिसात बुधवारी रात्री चव्हाण यांच्या विरु्दध फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

पोलिस हवालदार काकासाहेब राख तपास करीत आहेत. पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथील दोघांनाही नोकरीच्या अमीषाने लाखो रुपयाला गंडा घातल्याचे समजते.

तक्रार केली तर पैसे देणार नाही अशी धमकी फसवणारा देत असल्याने पोलिसात जाऊन तरी काय करायचे अशी कोंडी बेरोजगार युवकांची झाली आहे.टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post