Adsense


👉 सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांशजण घरीच बसून आहेत. मात्र काहीजण याचा सदुपयोग करून आपापले छंद जोपासत आहेत.

👉 अशातच Aurangabad येथील गिरीजा ठाकूर यांनी दोन चिमुकल्या मुलांच्या साहाय्याने घरातील रद्दी पेपर, पुठ्ठे व थर्मोकोलचा वापर करून विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती बनवली आहे.

👉 तीन दिवसांवर आषाढी एकादशी आहे. प्रत्येकाला पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घ्यावे वाटते. आम्हालाही विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जायचे होते,

👉 मात्र या वर्षी कोरोनामुळे आपल्याला विठ्ठलाचे प्रत्यक्षात दर्शन घेता येणार नाही.  त्यामुळे मी व दोन चिमुकली मुले आदित्य बोर्डे व साक्षी पाटील यांच्या मदतीने विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती बनवली आहे.

👉 यासाठी आम्हाला मंजू रणसिंग यांचे मार्गदर्शन लाभले, असे गिरीजा ठाकूर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post