रुसवा फुगवा आणि प्रेम Inflation and love


आज पुन्हा तिचं आणि माझं भांडण झालं, ती अबोला धरुन बसली काही बोलतचं नव्हती, मी खुप समजावूनही ती काही ऐकायलाच तयार नव्हती, शेवटी माझा उदास झालेले चेहरा पाहून ती बोलली..
ती,'' अजिबात बोलू नकोस माझ्याशी..
मी,'' आता काय झालं गं पिल्लू, विनाकारण माझ्यावर रागवायला ???
ती,'' उठ इथून पळ..
मी,'' आधी मला सांग काय झाले ते ? तरच मी इथून उठेल..
ती,'' खुप मोठा चोर आहेस तू, माझे ह्रदय चोरलेयस तू..
मी,'' बरं मग आता काय शिक्षा देणार आहेस या चोराला, की अबोल राहून फक्त सतवणार आहेस ???
ती,'' शिक्षा मुळीच नाही देणार..
मी,'' मग काय करणार आहेस ???
( ती काहीच बोलत नाही कसला तरी विचार करते, आणि पुन्हा अबोला धरते...!!)
मी,'' हो मी चोरले तुझे ह्रदय, पण, बदल्यात तुला माझे ह्रदय दिले नाही का..
ती,'' ते काही एक सांगू नको मला, आता मी पण चोरी करणार आहे..
मी,'' बरं, काय चोरणार आहेस तू ???
ती,'' तुझे आडनाव..
(हे ऐकताच मी तिला घट्ट मिठी मारली...!! आणि परत तोच रुसवा फुगवा आणि प्रेम चालू झाले .)