🧐 लॉकडाऊनमध्ये कोहलीची 'एवढी' कमाई


⚡ लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्यावर परिणाम झाले, काही उद्योगधंदे बुडाले. गेल्या अडीच महिन्यांपासून क्रीडाविश्वही शांत असल्याने अनेक खेळाडूंनाही आर्थिक चणचण जाणवत आहे, मात्र अशा परिस्थितीतही 'टीम इंडिया'चा कर्णधार विराट कोहलीने घरबसल्या जवळजवळ 3.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

💁🏻‍♂️ इन्स्टाग्रामवरील खेळाडूंच्या या कमाईत कोहली सहाव्या स्थानावर असून, स्टार फुटबॉलपटू खिस्तियानो रोनाल्डो अव्वल स्थानावर आहे.

👉🏻 अहवाल : इन्स्टाग्रामवर पोस्ट करून कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये टॉप-10 मध्ये विराट कोहली एकमेव खेळाडू आहे. 12 मार्च 14 मे या कालावधीत खेळाडूंनी पोस्टवर केलेल्या कमाईचा अहवाल तयार केला आहे.

💸 कमाई : कोहलीने लॉक डाऊनच्या काळात तीन स्पॉन्सर पोस्ट केल्या आणि त्यातून त्याला 3 कोटी 60 रुपयांची कमाई केली आहे. याचा अर्थ विराटने एका पोस्टमधून साधारण 1.2 कोटी रुपयांची कमाई केली.

📌 इन्स्टाग्रामवर कोहलीचे 6.2 कोटी फॉलोअर्स आहेत. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू खिस्तियानो रोनाल्डोने सर्वाधिक 18 कोटी रुपयांची कमाई केली आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 22.2 कोटी फॉलोअर्स आहेत.