Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


अहमदनगर बातमी : शहरापासून जवळच असलेल्या चांदबीबी महालावर नागरिक दररोज किंवा सुटीच्या दिवशी  फिरण्यासाठी मोठी  गर्दी करतात. हा भाग निसर्गाने नटलेला असून हे पर्यटकांचे विशेष आकर्षण स्थळ आहे. इथे असलेल्या दाट झाडीमुळे या ठिकाणी अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व देखील आहे.

रविवारी सकाळी नगरमधील अभिजित पाडळकर, पराग गावडे, प्रवीण राठोड व अन्य मित्र रविवारची सुटी असल्याने या भागात फिरायला गेले होते.

महालाच्या आलीकडे त्यांना रस्त्यापासून जवळच  मोरांचे ओरडण्याचे आवाज ऐकू आल्याने त्यांनी ते पाहण्यासाठी मुख्य रस्ता सोडून ते डोंगर उतारावर उतरले.

रस्त्यापासून अवघ्या दोनशे फुटांवर ते मोरांच्या जवळ पोहोचले असतानाच बाजूच्या करवंदाच्या जाळीत मोरांच्या शिकारीसाठी बिबट्या दबा धरून बसलेला होता.

हे तीन चार जण जवळ पोहोचल्याचे पाहून त्याने डरकाळी फोडत त्यांच्याविरुद्ध दिशेला उडी मारली. अचानक बिबट्यासमोर दिसल्याने या युवकांनी घाबरून तेथून पळ काढला.

निसर्गमित्र व जिल्ह्याचे व्याघ्र संरक्षण समिती सदस्य मंदार साबळे यांना कळवले. यावेळी त्यांचे मोबाईल रेकॉर्डिंग सुरू असल्याने त्यात डरकाळीचा आवाज रेकॉर्ड झाला.

साबळे यांनीही तातडीने या ठिकाणी जात हा परिसर पिंजून काढला. या भागात त्यांना डोंगर उतारावर काही भागात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले.

ठसे पाहता हा मध्यम वयाचा बिबट्या असून गेल्या आठ दहा दिवसंपासून त्याचे या भागात वास्तव्य असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

साबळे यांनी तातडीने याबाबत जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी व वनपरिक्षेत्र अधिकारी एन. बी. पोकळे यांना याची  माहिती दिली. तसेच या भागात नियुक्त कर्मचाऱ्यांना या ठिकाणी गस्त वाढवून नागरिकांच्या फिरण्यावर लक्ष ठेवण्याविषयी सूचना दिल्या.

नागरिकांनी महालाच्या परिसरात फिरताना मुख्य रस्ता सोडून कुठल्याही आडवाटेने महालावर अथवा करवंद तोडण्यासाठी जाऊ नये, तसेच गुरख्यानीही गुरे घेऊन डोंगर उतारावर जाऊ नये, असे आवाहन साबळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post