Adsense


पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील एक ४८ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे यांनी दिली आहे.

मुंबई कळंबोली येथून आलेला ४८ वर्षीय कोरोना बाधित व्यक्ती पोलीस दलात कार्यरत असून १ जून रोजी आपल्या चिंचपूर इजदे गावी आली होती.

त्यांनतर त्याला त्रास होऊ लागल्याने दि २ जून रोजी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयातून अहमदारनगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
त्यांनतर या व्यक्तीचा आज कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाचा रुग्ण आढळल्याने सर्वचीच धाकधूक वाढली आहे.

हा कोरोना बाधित व्यक्ती गावातील आपल्या शेतात राहत होता. प्राथमिक माहिती अनुसार बाधित व्यक्तीच्या संपर्कातील पत्नी, आई, तीन मुले असे एकूण पाच व्यक्ती आहे आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे, कोव्हीड प्रमुख डॉ. महेंद्र बांगर, डॉ. अमोल दहिफळे, डॉ. अक्षय जयभाय, डॉ. बाबासाहेब होडशीळ, आरोग्य सेवक राहुल कर्वे, शिवाजी बडे यांच्या हे पथक या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात कोणी आले आहेत का? याचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाचं पथक चिंचपूर गावात दाखल होऊन माहिती घेत आहे.

तालुक्यात यापूर्वी मोहंजदेवढे येथे एक पंचेचाळीस वर्षीय पुरुष तर चिंचपूर पांगुळ येथे एक बावीस वर्षीय गरोदर महिला असे दोन रुग्ण सापडले होते. ते कोरोना मुक्त झाले आहेत. परत कोरोनाचा शिरकाव तालुक्यात झाल्याने सर्वांचाच चिंतेत भर पडली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post