Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


जिल्ह्यात आज नव्याने सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले. नगर शहर, पारनेर, शेवगाव व संगमनेर येथे हे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 183 झाली आहे.
नगर शहरातील नेप्ती रोडलगत असलेल्या लालनगर येथे नेप्ती येथील 50 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळली आहे. शेवगाव येथील रानेगावचे 32 वर्षीय युवा बाधित आढळला आहे. हा युवक संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता. पारनेर येथील भाळवणी तील दहा वर्षे मुलगा तर 28 वर्षीय युवती कोरोनाबाधित आढळली आहे. संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील 18 वर्षे युवक तर नवघर गल्लीतील बत्तीस वर्षे युवकाला ही कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान आज कोरोनातून जिल्ह्यातील आणखी आठ रुग्ण बरे झाले आहेत. नगर तालुका, नगर शहर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, राहूरी आणि पारनेर येथील हे रुग्ण आहेत. सर्व कोरोनामुक्त झालेले रुग्ण हे बाहेरील जिल्हयातून अहमदनगर जिल्ह्यात आले होते. आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या एकूण व्यक्तींची संख्या आता 90 झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post