Adsense


बजाजनगर येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने घरात फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

👉 अचल मनोहर तायडे (वय 16 रा. बजाजनगर, औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

👉 मिळालेल्या माहितीनुसार, बजाजनगर भागातील दक्षिणमुखी मंदिराच्या आवारात तायडे कुटुंब राहते. गुरुवारी सायंकाळी अचल तायडे या मुलीने स्वतः च्या घरात फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

👉 दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीला घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वाळूज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post