Adsense


⚡ 'अनलॉक'च्या पहिल्या टप्प्यात येत्या 8 जूनपासून शॉपिंग मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि धार्मिक स्थळे, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याची नागरिकांना परवानगी मिळणार आहे. त्यानुसार, अनेक धार्मिक स्थळ भाविकांसाठी खुली करण्याची तयारी सुरू झाली आहे.
[Take care of this while going to religious places!]
💁🏻‍♂️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिशानिर्देश नागरिकांनी पाळणे आवश्यक आहेत. धार्मिक स्थळांवर नियमांमध्येच भाविकांना दर्शन घेता येणार आहे. भाविकांना मंदिरांमध्ये घंटी वाजवता येणार नाही. मंदिर, गुरुद्वारांमध्ये आत बसण्याची परवानगी दिली नाही. सर्व धार्मिक स्थळांवर सोशल डिस्टन्सिंगचा नियम नागरिकांना कटाक्षाने पाळावा लागणार आहे.

😷 धार्मिक स्थळांवर भाविकांसाठी नियम : 

▪️ मंदिरात कोणालाही मूर्तीसमोर कोणत्याही वस्तू अर्पण करता येणार नाहीत.

▪️ कोणत्याही भाविकांना मंदिरात प्रसाद वाटता येणार नाही.

▪️ मंदिरात घंटा वाजवता येणार नाही, अनेक मंदिरात घंटा कपड्यांनी बांधून ठेवल्या आहेत.

▪️ धार्मिक स्थळांना वारंवार सॅनिटाईझ करणे गरजेचे असणार आहे, यासाठी अनेक ठिकाणी सॅनेटाईज टनेल उभारले आहेत.

▪️ धार्मिक स्थळांवर लहान मूलं, गर्भवती महिला आणि 65 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना येण्यास बंदी घातली आहे.

▪️ सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी अनेक ठिकाणी भाविकांना मंदिरात उभे राहण्यासाठी गोल आखले आहेत


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post