Adsense


👉केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा ठरवण्यासंदर्भात आज बैठक झाली. या बैठकीत पूर्व आणि मुख्य परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली.

👉कोरोना संसर्गामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी प्रिलिम्स (पूर्व परीक्षा) आणि मेन (मुख्य) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर आयोगानं परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा ठरवण्यासंदर्भात आज बैठक झाली. या बैठकीत पूर्व आणि मुख्य परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली.

👉कोरोना संकटामुळे स्थगित झालेल्या यूपीएससीच्या विविध परीक्षांसाठीचं नवं वेळापत्रक आयोगानं जाहीर केलं आहे. 2020 वर्षात होणाऱ्या परीक्षांसाठी हे नवं वेळापत्रक यूपीएससीच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलंय. सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा जी आधी 31 मे रोजी नियोजित होती, ती लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आली होती. नव्या वेळापत्रकानुसार सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा 4 ऑक्टोबर रोजी तर मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. शिवाय 2019 च्या परीक्षेमध्ये मुलाखतीचा टप्पा कोरोनामुळे अपूर्ण राहिला होता. ज्या उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या, त्या 20 जुलैपासून सुरु होणार आहेत. त्याबाबत उमेदवारांना वैयक्तिक पत्राद्वारे तारीख कळवली जाईल. एनडीएची परीक्षा 10 जून रोजी होणार आहे.

👉स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा, वयोमर्यादेत यंदाच्या वर्षासाठी 1 वर्ष वाढ होण्याची शक्यता

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post